शिक्षक संघटना सरसावल्या ; टाकेद प्रकरणातील गुन्हेगारांना कठोर शिक्षेची निवेदनाद्वारे मागणी

इगतपुरीनामा न्यूज – टाकेद बुद्रुक ता. इगतपुरी येथे झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा इगतपुरी तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टावर चालवण्यात यावे. संबंधित नराधमांना अधिकाधिक कठोर शिक्षा करावी अशी सर्व शिक्षक संघटनांची मागणी आहे. त्याबाबतचे निवेदन सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने इगतपुरीचे तहसीलदार, गटविकास अधिकारी व घोटी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना संघटनांच्या वतीने देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, मागासवर्गीय शिक्षक संघटना, आदिवासी शिक्षक संघटना, पदवीधर शिक्षक संघटना, शिक्षक भारती, समता परिषद व शिक्षक परिषदेचे सर्व पदाधिकारी निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.

error: Content is protected !!