नाशिक जवळील अपघातात २ जण गंभीर जखमी ; नरेन्द्राचार्य रुग्णवाहिकेमुळे वाचले प्राण

इगतपुरीनामा न्यूज, दि. १

नाशिक कडून मुंबईकडे जाताना डोंगर बाबा जवळ मोटरसायकलच्या झालेल्या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले. आज दुपारी १२ वाजता झालेल्या ह्या अपघाताची माहिती समजताच नरेन्द्राचार्य संस्थान मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णवाहक रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी गंभीर जखमी युवकांना तातडीने नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. वेळेत उपचार मिळाल्याने दोघांचा जीव बचावला.
आपल्या दुचाकीवरून नाशिककडून मुंबईकडे प्रवास कटणारे गणेश मुरलीधर कोंढार वय 31, योगेश मुरलीधर कोंढार वय 45 दोघे रा. मवेशी ता. अकोले जि. अहमदनगर हे अपघातग्रस्त झाले. ह्यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. याबाबत नागरिकांनी नरेन्द्राचार्य संस्थान मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णवाहक रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांना माहिती दिली. त्यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून दोघा गंभीर जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. वेळेत उपचार मिळाल्याने दोघांचा जीव बचावला.