काल्याच्या किर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता : दिंडीतील वारकरी फुगड्या व पावल्यांनी ग्रामस्थांचे वेधले लक्ष

निलेश काळे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१

इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर येथे सालाबादप्रमाणे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता आज काल्याच्या किर्तनाने झाली. अखंड २२ वर्षे चालणाऱ्या द्वितपपूर्तीकडे चाललेल्या सप्ताहात समाजप्रबोधन, स्त्रीभ्रूणहत्या, संस्कार आदी प्रबोधन करण्यात आले.
सप्ताहात सुदाम महाराज गायकवाड, बाळासाहेब महाराज गतीर यांचे सुश्राव्य प्रवचन आयोजित करण्यात आले होते. कीर्तनप्रसंगी सुदाम महाराज गायकवाड, श्याम महाराज पवार, ज्ञानेश्वर माऊली कदम, देवराम महाराज गायकवाड, अनिल महाराज तुपे, मठाधिपती माधव महाराज घुले, मनोहर घोडे, बाळू महाराज इगतपुरी यांची कीर्तने आणि काल्याच्या कीर्तन दिगंबर महाराज सोनवणे यांचे होते. काल्याच्या दिवशी काकडा आरती प्रसंगी सालाबादप्रमाणे कावडधारकांनी सर्वतीर्थ टाकेद येथून तीर्थ आणले. कावडीच्या ग्रामप्रदक्षिणेनंतर हनुमंताच्या मूर्तीस स्नान घालण्यात आले. काल्याच्या कीर्तनापूर्वी दिंडी सोहळा व ग्रामप्रदक्षिणा झाली. दिंडीतील फुगड्या व पावल्यानी ग्रामस्थांसह वारकरी मोहित झाले.

Leave a Reply

error: Content is protected !!