हिंदू नवीन वर्षानिमित्त खडकवाडीच्या महिलांनी केली गावाची साफसफाई : ग्रामस्थांच्या संकल्पनेतून उजळले खडकवाडी गाव

इगतपुरीनामा न्यूज – हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या निमित्ताने इगतपुरी तालुक्यातील खडकवाडी येथील ग्रामस्थ आणि महिलांनी नवा पायंडा पाडला आहे. ह्या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण गावात स्वच्छता अभियान राबवून गावाला यापुढेही स्वच्छ आणि सुंदर बनवण्याची शपथ घेण्यात आली.  बचत गटाच्या सर्व महिलांनी पदर खोचून स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन परिसर साफ केला. रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या, ओला आणि सुका कचरा जमा करण्यात आला. साफसफाई झाल्यानंतर कचऱ्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत प्रसिद्धी महिला स्वयं सहाय्यता समूह अध्यक्ष सुलोचना भावडू दालभगत, सचिव शिवानी मोहन दालभगत, शिवछत्रपती महिला बचत गट अध्यक्ष रेश्मा दत्तात्रय कडू, सचिव अश्विनी भरत कडू, जय दुर्गा माता बचत गट अध्यक्ष कौसाबाई गोरख कडू, सचिव रामेश्वरी समाधान कडू, उर्मिलाबाई कडू, आशाबाई कडू, सरस्वती कडू, वनिता कडू, माया कडू, लक्ष्मीबाई कडू, जयश्री कडू, जिजाबाई कडू, लहानुबाई कडू, सरूबाई कडू, राधा कडू, शितल कडू, शालेय विद्यार्थिनी अर्चना, अंकिता, गायत्री, आरती, वेदिका, प्रेमा, तनुष्का, आर्या, सोनाली, लाडू, योगिनी, गौरव कडू, रुपेश कडू, तुषार कडु, भरत कडू, बळीराम कडू आदींसह ग्रामस्थ सहभागी झाले होते.

Similar Posts

error: Content is protected !!