टिटोली येथे विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रमांनी प्रजासत्ताक दिन साजरा

इगतपुरीनामा न्यूज – ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त टिटोली येथे विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. शाळेचे ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समिती सदस्या अनिता हाडप यांनी, ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण उपसरपंच माया भडांगे यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रम आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करून शाळेची यशोगाथा मांडण्यात आली. टिटोली ग्रामपंचायत व ड्यु ड्रॉप्स रिसॉर्ट यांचे उपक्रमांसाठी सहाय्य लाभले. मागासवर्गीय कुटुंबांना भांडी, शाळा विकासासाठी निधी, १८२ विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. सरपंच कोमल हाडप, माजी सरपंच अनिल भोपे व सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्धापन समिती उपाध्यक्ष भरत हाडप व सर्व सदस्य, अंगणवाडी सेविका, श्री संग्राम सोशल ग्रुप, ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, पालक, सर्व बचत गट उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका मंगला शार्दूल, राजकुमार गुजाळ, रामदास गंभीरे, प्रतिभा सोनवणे, मंगला धोंडगे, स्नेहल शिवदे, राज्य आदर्श शिक्षक सिध्दार्थ सपकाळे, ग्रामसेवक महेंद्र पाटील यांनी परिश्रम घेतले.

Similar Posts

error: Content is protected !!