इगतपुरीनामा न्यूज – महामार्गासह सर्वच रस्त्यांवरील सुरक्षितता सुधारण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, या निमित्ताने सर्वांना योगदान देण्याची संधी देण्यासाठी रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येतो. यानुसार महामार्ग पोलीस केंद्र घोटी यांच्यातर्फे राष्ट्रीय महामार्ग ३ येथे रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिग्नलचे पालन करा, गाडी चालवतांना मोबाईलवर बोलू नका, मद्यपान करून गाडी चालवू नका, कानाला हेडफोन लावून गाडी चालवू नका, गाडी चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करा याबाबत मार्गदर्शन आणि २५ वाहनचालकांना प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. सुरक्षितता ही फक्त घोषणा नाही. जीवनाचा एक मार्ग आहे. रस्ता सुरक्षेबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने आम्ही रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करतो अशी माहिती महामार्ग पोलीस केंद्र घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राम होंडे यांनी दिली. कार्यक्रमावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक राम होंडे, पोलीस उपनिरीक्षक पंजाबराव साळुंखे, पोलीस हवालदार सुनील खताळ, देवराम हाडस, पोलीस नाईक अविनाश माळी, पोलीस अंमलदार प्रवीण चासकर, सचिन बेंडकुळे, जगद्गुरु नरेंद्राचार्य संस्थानचे रुग्णमित्र कैलास गतीर, महिंद्रा कंपनीचे डेप्युटी मॅनेजर सयाजी जाधव, फायर ऑफिसर हरिष चौबे, फायरमन अक्षय उबाळे, निसार मेमन उपस्थित होते.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group