इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१
त्र्यंबकेश्वर येथील मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कळसुबाई मिलेट फार्मर्स प्रोड्यूसर्स या सामाजिक विकास बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने गरजवंत गरिब मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. के. शिंदे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी बोलतांना प्राचार्य डॉ. शिंदे म्हणाले की, गरजवंत विद्यार्थ्यांना अडचणीमुळे शिक्षण घेता येत नाही. मात्र सायकल मिळाल्यावर तिचा उपयोग झाला पाहिजे. कळसुबाई मिलेट फार्मर्स प्रोड्यूसर्स या सामाजिक विकास बहुउद्देशिय संस्थेच्या प्रमुख निलिमा जोरवर, सुनील घनदाट यांच्या दातृत्वातून कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय त्र्यंबकेश्वर येथील प्रथम वर्ष विज्ञान शाखेत शिकणाऱ्या कु. गायत्री दौलत बोडके, कु. पूजा दौलत बोडके या विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी आनंदाने भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी महाविद्यालय सकाळ सत्र प्रमुख प्रा. संदीप गोसावी, प्रा. डॉ. शरद कांबळे, प्रा. डॉ. संदीप माळी, प्रा. डॉ. मिलिंद थोरात, प्रा.भागवत महाले, प्रा. मनोहर जोपळे, प्रा. सोमनाथ महाले, टी. एस. धोंडगे, प्रा. डॉ. एन. बी. पाटील, प्रा. संकेत भोर आदींनी विशेष परिश्रम घेतले.