महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती नाशिक जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी अनिल शिरसाठ यांची नियुक्ती

इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती नाशिक जिल्हा शाखेच्या प्रसिद्धी प्रमुखपदी अनिल शिरसाठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इगतपुरी तालुक्यातील जामुंडे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक म्हणून ते कार्यभार पाहत आहेत. प्राथमिक शिक्षक समिती राज्य अध्यक्ष काळुजी बोरसे पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. याप्रसंगी राज्य कोषाध्यक्ष केदु देशमाने, राज्य उपाध्यक्ष आनंदा कांदळकर, राज्य पदाधिकारी पांडुरंग कर्डिले, विभागीय अध्यक्ष सुनिल भामरे, विभागीय पदाधिकारी हेमंत पवार, महिला आघाडीप्रमुख विद्या पाटील, जिल्हा नेते जिभाऊ बच्छाव, जिल्हाध्यक्ष प्रकाश अहिरे, जिल्हा सरचिटणीस साहेबराव पवार, अशोक कुमावत, केंद्रप्रमुख संघटनेचे इगतपुरी तालुकाध्यक्ष सुभाष गादड उपस्थित होते. अनिल शिरसाठ यांच्या नियुक्तीचे जिल्हाभर स्वागत करून अभिनंदन करण्यात येत आहे.

Similar Posts

error: Content is protected !!