इगतपुरी तालुक्यात खुनाच्या २ घटना ; इगतपुरी, घोटी पोलीस ॲक्शन मोडवर

इगतपुरीनामा न्यूज – ऐन दिवाळीच्या दोन दिवसात इगतपुरी तालुक्यात दोन खुनाच्या घटना घडल्या आहेत. पहिल्या घटनेत इगतपुरी पोलीस ठाण्याच्या हद्धीत पिंप्री सदो येथे संजय देहाडे यांचा जमिनीच्या वादातुन खून झाल्याचे सोमवारी उघडकीस आले. याप्रकरणी संशयित आरोपी उज्वला महेंद्र उबाळे, लताबाई बाळु उबाळे, नंदाबाई पटवर्धन उबाळे, पटवर्धन उबाळे यांच्या मुली बायडी उर्फ सुरेखा, सायली, सोनी, यशवंत उर्फ गोट्या उबाळे, प्रथमेश उबाळे, सिध्दार्थ उबाळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इगतपुरी पोलिसांकडून पुढील तपास सुरु झाला आहे. दुसरी खुनाची घटना घोटी पोलीस ठाण्याच्या हद्धीतील रामरावनगर घोटी येथे आज रात्रीच्या वेळेत घडली. रामराव नगर परिसरात पूर्ववैमनस्यातून दगडाने ठेचून प्रमोद शिंदे वय ३९ यांचा खून झालेला आहे. घोटी पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. संबंधित संशयित आरोपी शोधण्यासाठी पोलिसांनी कसून तपास सुरु केला आहे.

Similar Posts

error: Content is protected !!