
इगतपुरीनामा न्यूज – मुख्यमंत्री माझी शाळा नाशिक तालुका प्रथम आलेल्या विल्होळी जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळेने पीएमश्री जिल्हा परिषद अध्यक्ष चषकमध्ये घवघवीत यश प्राप्त केले. विल्होळी शाळेने सर्व स्पर्धामध्ये भाग घेत प्रथम क्रमांकाचे १४ व द्वितीय क्रमांकचे २ व तृतीय क्रमांकाचे २ अशी बक्षिसे पटकावली सर्व जिल्हा परिषद बिटस्तरीय कला, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा विल्होळी येथे संपन्न झाल्या. यावेळी विल्होळीच्या सरपंच जानकाबाई चव्हाण, उपसरपंच भास्कर थोरात, पोलीस पाटील संजय चव्हाण, ग्रामविकास अधिकारी अरुण आहेर, एसएमसी अध्यक्ष संजय गायकवाड, उपाध्यक्ष धोंडीराम थोरात, सदस्य चंद्रभागा कदम, संपत बोंबले, सुभाष थोरात, सुवर्णा आचारी, विजया लहांगे, प्रियंका रुपवते, निला धोंगडे, सविता शिंदे, मीरा बेंडकोळी, गायत्री थोरात, मनोहर भावनाथ, गोरख महाले, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, सर्व मुख्याध्यापक व शिक्षक आदी उपस्थित होते.निवृत्त मुख्याध्यापक भाऊसाहेब आहेर यांनी दिलेल्या बिटस्तरीय ट्रॉफीचा मान विल्होळी शाळेला लाभला. मुख्याध्यापिका अरुणा सोनवणे, आशालता फलके, सतीष लाड, सुवर्णा पवार, संगीता नागपुरे, शैलजा सामुद्रे, रुपाली शिंदे, आशा चौधरी, पौर्णिमा थोरात, शितल शिंदे, शोभा वारुंगसे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे विल्होळी ग्रामस्थ यांनी कौतुक करून अभिनंदन केले आहे.