स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजी राजे यांचा इगतपुरी तालुक्यात भरगच्च दौरा : विविध गावांत शाखा उदघाटन ; गोंदे दुमाला येथे सायंकाळी जाहीर मेळावा

इगतपुरीनामा न्यूज, दि. 29

30 ऑक्टोबरला स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी राजे इगतपुरी तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. गाव तिथे शाखा आणि घर तिथे स्वराज्य या अभियानांतर्गत तालुक्यातील अनेक गावांमध्ये शाखा उदघाटन कार्यक्रम होणार आहे. गोंदे दुमाला येथे सायंकाळी जाहीर मेळावा होणार आहे. मेळाव्यासाठी जिल्ह्यासह तालुकाभरातून स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. ह्या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते करण गायकर यांनी केले आहे.

विल्होळी, सारुळ, राजुर बहुला, आंबे बहुला, वाडीवऱ्हे, कुऱ्हेगाव, बेलगाव कुऱ्हे, अस्वली स्टेशन, नांदुरवैद्य, वंजारवाडी, शेणित, साकुर फाटा, साकुर गाव, एसएमबीटी, कवडदरा, धामणगाव, धामणी, पिंपळगाव मोर, उभाडे, खैरगाव, कांचनगाव, घोटी, इगतपुरी, खंबाळे, पाडळी देशमुख, मुकणे, गोंदे दुमाला आदी गावात शाखाचे उदघाट्न होईल. सायंकाळी गोंदे दुमाला येथे जाहीर मेळावा होणार आहे. अधिक माहितीसाठी स्वराज्य प्रवक्ते करण गायकर, निमंत्रक गणेश कदम, तुषार जगताप, डॉ. रुपेश हरिश्चंद्र नाठे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!