इगतपुरीनामा न्यूज – अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हा आयोजित १३ वे नवोदित व ग्रामीण राज्यस्तरीय साहित्य संमेलन सोमवारी ३० डिसेंबरला राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त आदर्श गाव मोडाळे येथे स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे सभागृहात होणार आहे. संमेलनाचे उदघाटन ८ वाजता माजी आमदार हेमंत टकले यांच्या हस्ते होईल. संमेलनाध्यक्षपदी सुप्रसिध्द ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे भूषवतील. स्वागताध्यक्ष म्हणून माजी जि. प. सदस्य विकासाचे शिल्पकार गोरख बोडके काम पाहतील “साहित्य संमेलनाची गरज का आहे ?” या परिसंवादात राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे व पुणे विभागीय अध्यक्ष प्रा. सुर्यकांत नामुगडे यांचे चिंतनपर भाष्य होईल.आमदार हिरामण खोसकर हे सलग दुसऱ्यांदा आमदार झाल्याबद्दल आणि माजी संमेलनाध्यक्ष देविदास खडताळे यांच्या पंच्चाहत्तरीबद्दल सत्कार होईल. उदघाटन सत्राचे प्रास्ताविक आयोजक तथा नाशिक जिल्हाध्यक्ष नवनाथ गायकर करतील. सुत्रसंचालन बाळासाहेब गिरी करतील. सकाळी ७ वाजता ग्रंथदिंडीचा प्रारंभ गोरख बोडके यांचे हस्ते होईल. यात भजनी मंडळ व ज्ञानदा विद्यालयाचे लेझीम व नृत्य पथक सहभागी होणार आहे. नंतर निमंत्रितांचे कवी संमेलन होणार असून अध्यक्षस्थानी जेष्ठ कवी माणिकराव गोडसे हे असतील. सुत्रसंचालन कवी रमेश मुकणे करतील. यावेळी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात गुणवंत कामगिरी करणाऱ्यांना मान्यवर पुरस्कार प्रदान करतील. दुसऱ्या सत्रातील कथाकथनाच्या अध्यक्षपदी प्रसिध्द लेखक प्रशांत कोतकर तर प्रमुख अतिथी म्हणुन लेखक दिलीप कजगावकर असतील. आदर्श गाव या विषयावर गोरख बोडके यांची प्रकट मुलाखत होईल. खुल्या कवीसंमेलनाा नंतर सायं ६ वाजता समारोप होईल अशी माहिती निमंत्रक तथा जिल्हाध्यक्ष नवनाथ गायकर यांनी दिली.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group