इगतपुरीनामा न्यूज, दि. २४
मुंबई आग्रा महामार्गावरील माणिकखांब फाट्यावरइसम रस्त्याच्या कडेला बेशुद्ध अवस्थेत रात्रभर पावसात भिजत पडून होता. सकाळी दोन ओमनी चालक मालक अंबादास त्र्यंबक चव्हाण व दिपक रामदास चव्हाण यांनी माणिकखांबचे सरपंच हरीश चव्हाण यांनी याबाबत सर्व माहिती दिली. त्यांनी तातडीने घोटीचे पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांना कळवले. बिट हवालदार शिवाजी शिंदे, पोलीस पाटील पाटिल उत्तम पगारे यांनाही माहिती दिली. यानंतर टोल नाका येथील ऍम्ब्युलन्सद्वारे त्या इसमाला घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. योग्य वेळेत उपचार मिळाल्याने ह्या इसमाचा जीव वाचल्याने हरीश चव्हाण यांच्यासह सहकाऱ्यांचे कौतुक होत आहे.
यशपाल राजेंद्र यादव रा. उत्तर प्रदेश गांव देवरिया तहसिल भराज असे त्या इसमाचे नाव आहे. माणिकखांब येथील सामाजिक कार्यकर्ते अंबादास त्र्यंबक चव्हाण, दिपक रामदास चव्हाण यांनी ह्याकामी मोलाचे सहाय्य केले. घोटी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. राहुल वाघ यांनी लगेच उपचार केल्याने हा इसम 8 तासांनी शुद्धीवर आला. डॉक्टरांच्या माहिती नुसार हा इसम अजून पावसात भिजला असता तर तो वाचू शकला नसता. आज या सर्वाच्या सहकार्याने त्याचा जीव वाचला त्याबद्दल सर्व मदत करणाऱ्याचे त्या इसमाने शुद्धी वर आल्यावर आभार मानले आहे.