
इगतपुरीनामा न्यूज, दि. २५ – यशलक्ष्मी भारत गॅस वितरक यांच्या वतीने आज गोंदे येथे एलपीजी पंचायतीचे आयोजन करण्यात आले. गोंदे दुमालाच्या उपसरपंच शोभा राजाराम नाठे यांच्या अध्यक्षतेखाली ह्या पंचायतीचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायत सदस्य शिवानंद महाराज बेंडकोळी यावेळी उपस्थित होते. यशलक्ष्मी भारत गॅसचे मेकॅनिक विष्णू उगले यांनी सर्व उपस्थित महिलांना गॅस वापरासंबंधी सर्व माहिती दिली. गॅस वापरताना कोणती काळजी घ्यावी, दुर्घटना घडल्यास काय करावे याबाबत त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. यशलक्ष्मी भारत गॅसच्या वतीने उपस्थित महिलांमधून लकी ड्रॉ काढण्यात आला. प्रथम क्रमांकाच्या महिलेला नॉनस्टिक तवा व इतर पाच महिलांना गॅस लाइटर भेट म्हणून देण्यात आले. गॅस संबंधीच्या अनेक नवीन गोष्टी समजल्याने महिलांनी भारत पेट्रोलियम कार्पोरेशनला धन्यवाद दिले. यशलक्ष्मी भारत गॅसचे संचालक भाऊसाहेब नाठे, जयश्री नाठे यांनी सर्व उपस्थित महिला वर्गाचे आभार मानले.
