
इगतपुरीनामा न्यूज – लोकनेते गोपीनाथ मुंढे यांनी सर्वांवर चांगले संस्कार केले आहेत. यामुळेच त्यांना कुणी कधीही विसरू शकत नाही. त्यांच्यावर प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते आहेत. लोकसेवक म्हणून जनतेच्या प्रश्नांना नाय मिळवून देणाऱ्या मुंढे साहेबांच्या समृद्ध विचारांचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन 1970 ओल्ड प्रभू ढाब्याचे संचालक विलासभाऊ चाटे यांनी केले. गोंदे दुमाला येथील ओल्ड प्रभू ढाब्यात लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीप्रसंगी अभिवादन कार्यक्रमात विलास चाटे बोलत होते. हॉटेलचे जेष्ठ संचालक बंडूशेठ चाटे, अविनाश भाऊ चाटे, मोहित भाऊ चाटे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आठवणींना उजाळा देत बंडूशेठ चाटे पाटील यांनी सांगितले की 1980 मध्ये लोकनेते गोपीनाथ मुंढे यांनी आमच्या 1970 मध्ये स्थापन झालेल्या ओल्ड प्रभू हॉटेलला भेट दिली होती. यावेळी जेवणाचा परिपूर्ण आस्वाद घेऊन साहेबांनी मोठे कौतुक केले होते. त्यांची प्रेरणा घेऊनच हॉटेल दिमाखात सुरू आहे. आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, दीनदुबळ्या लोकांच्या प्रश्नांवर आवाज उठविणारे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे विचार लोकांपर्यंत जावेत असे आवाहन विलास चाटे यांनी केले.