शिक्षणाची चळवळ समृद्ध करण्यासाठी पेहेचान प्रगती फाउंडेशनकडून अभिमानास्पद कामगिरी – शिक्षण उपसंचालक डॉ. योगेश सोनवणे : पेहेचान प्रगती फाउंडेशनचा प्रगती सन्मान पुरस्कार सोहळा उत्साहात

इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये सिंहाचा वाटा असणारे गुणवंत शिक्षक हेरून पेहचान प्रगती फाउंडेशन शिक्षणाची चळवळ समृद्ध करीत आहे. अतिदुर्गम भागात शिक्षणासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी अनंत अडचणी असतांनाही आमचे शिक्षक गुणवत्तापूर्ण काम करीत असल्याचा अभिमान वाटतो. सामाजिक उत्तरदायित्वाला प्राधान्याने महत्व देऊन काम करणारे पेहेचान प्रगती फाउंडेशन शिक्षकांच्या पंखात तीन वर्षांपासून भरत असलेले बळ कौतुकास्पद आहे असे गौरवोदगार महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक डॉ. योगेश सोनवणे यांनी केले. इगतपुरी तालुक्यातील पारदेवी येथे पेहेचान प्रगती फाउंडेशनतर्फे प्रगती सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. महाराष्ट्र राज्यात विद्यार्थीकेंद्रित अभ्यास आणि त्यावरील संशोधनात अनेक शिक्षकांनी आपले कौशल्य आणि क्षमता दाखवून दिली आहे. बदलत्या काळात सहज सोप्या मार्गाने परिणामकारक शिक्षण ही संकल्पना साध्य करण्यासाठी सर्वांगीण प्रयत्नांचा हा विजय आहे. यासाठी पेहेचान प्रगती फाउंडेशन गुणवंताचा परीघ बळकट करीत असल्याचेही श्री. सोनवणे यावेळी म्हणाले.

महाराष्ट्र गीताने पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली. प्रास्ताविकात राज्य आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी यांनी फाउंडेशनच्या आतापर्यंतच्या कार्याचा वेध घेतला. सिद्धार्थ सपकाळे यांनी उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून दिला. इगतपुरीचे गटविकास अधिकारी वळवी यांनी ध्वनीसंदेशाद्वारे कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. नांदगाव सदोचे केंद्रप्रमुख संजय बोरसे, पॆहचान प्रगती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा प्रगती अजमेरा यांची भाषणे झाली. सौ. ज्योती सोनवणे, फाउंडेशनच्या सदस्या जयश्री देसाई, रूपा सेन, राधा रुंगठा, गुरुदेव दुरानी, संयुक्ता दोषी, साधना दोषी, चहाना गांधी, उषा मर्चंट, सुनिता बैंद, मंजू केजरीवाल, मीना अग्रवाल उपस्थित होत्या. ईला कोठारी, फरीदा कपाडिया यांनी जेवणाची चोख व्यवस्था केली. प्रगती सन्मान पुरस्काराने संजय खैरनार, विद्या चव्हाण, मधुबाला कुडके, बबिता घोती, सोनाली नवले, सोनाली निकम, संजय लोहरे, सुरेखा निसाळ, राजकुमार गुंजाळ, योगेश वाकचौरे, कमलाकर नेमाडे, विश्वास सोनवणे, मनीषा उन्हवणे, वेणूबाई मेंगाळ, योगेश कांबळे, जितेंद्र मानकर, माधुरी जाधव, प्रतिभा करसाळे, मिना वाजे, डॉ. शुभम पाटील यांना मान्यवरांकडून ट्रॉफी, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन पत्रकार भास्कर सोनवणे यांनी तर आभार रवींद्र चव्हाण यांनी मानले.

Similar Posts

error: Content is protected !!