इगतपुरीनामा न्यूज – भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केलेला आहे. त्यानुषंगाने इगतपुरी ( अ ज ) विधानसभा मतदार संघ अंतर्गत १५५ मतदार केंद्रावर २१ जुलै ते २१ ऑगस्ट दरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ( ब्लॉक ) घरोघरी भेट देणार आहेत. यामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून १ जानेवारी २०२३ रोजी पात्र असलेले मात्र नोंदणी न केलेल्या मतदारांची मतदान नोंदणी करणे, १ जानेवारी २०२४ रोजी पात्र असलेल्या संभाव्य मतदारांची नोंदणी करणे. पुढील तीन अर्हता दिनांकावर पात्र असलेल्या संभाव्य मतदारांची मतदान नोंदणी करणे. एकापेक्षा अधिक नोंदी / मयत मतदार / कायमस्वरूपी स्थलांतर मतदार यांची वगळणी करणे. मतदार यादीतील नोंदीत दुरुस्ती करणे आदी कामे करण्यात येतील. सर्व कामे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ( ब्लॉक ) हे २१ जुलै ते २१ ऑगस्ट दरम्यान घरोघरी भेट देऊन प्रत्येक मतदान केंद्रातील यादी भागात करणार असल्याने सर्व मतदार आणि नागरिकांनी सबंधित सर्व BLO यांना सहकार्य करावे. नोंदणी न झालेले, तरुण मतदार (१८ ते १९ ) व वंचित घटकांतील सर्वांनी मतदान यादीत नाव नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर, निवडणुक नायब तहसीलदार वर्षा वाघ यांनी केले आहे.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group