इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी मतदारसंघातून माझे चिरंजीव बाळासाहेब झोले अपक्ष निवडणूक लढवत असून त्यांची निशाणी ऑटो रिक्षा आहे. मुलचंदभाई गोठी, स्व. गोपाळराव गुळवे, ॲड. छबाजी खातळे यांची परंपरा असलेला हा मतदारसंघ आहे. जेंव्हा पासून हा आदिवासी मतदार संघ राखीव झाला तेंव्हापासून या नेतेमंडळींनी स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देऊन त्यांना आमदार केले. आता नागरिकांची मागणी आहे की आता इगतपुरी मतदार संघातील स्थानिक भूमिपुत्रच आमदार झाला पाहिजे. स्थानिक भूमिपुत्र आमदार व्हावा यासाठी स्थानिक भूमिपुत्र जयप्रकाश झोले यांनी अपक्ष उमेदवारी केलेली आहे. माझा विश्वास आहे इगतपुरी मतदार संघातील जनता जयप्रकाशला आशीर्वाद देतील. मतदारराजा त्यांचं पवित्र अस बहुमोल मत ऑटो रिक्षाला देऊन प्रचंड मतांनी निवडून देतील आणि गोरगरीब जनतेची सेवा करण्याची संधी देतील असा विश्वास माजी आमदार शिवराम झोले यांनी जाहीर सभेत व्यक्त केला. अपक्ष उमेदवार माजी आमदार शिवराम झोले यांचे सुपुत्र युवानेते जयप्रकाश उर्फ बाळासाहेब झोले यांच्या प्रचारार्थ घोटी येथील सिन्नर फाटा ते राजाराम साळवी मंगल कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढून रोड शो करण्यात आला. बाळासाहेब झोले यांच्या प्रचारार्थ शेवटच्या दिवशी झालेल्या प्रचाराच्या या रॅलीने लक्ष वेधुन घेतले होते. या रॅलीचे राजाराम साळवी मंगल कार्यालयात जाहीर सभेत रुंपातर झाले. यावेळी माजी आमदार शिवराम झोले बोलत होते.
या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव शेतीद्वारे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी विविध उपाय योजना आणण्याचा प्रयत्न करणार. बेरोजगारीचा प्रश्न जटील झाला आहे. येथील सुशिक्षित तरुण वर्ग येथे काम नसल्याने नाशिक, मुंबई व पुणे येथे नोकरी निमित्त जात आहेत. ही अडचण लक्षात घेता गोंदे व वाडीवऱ्हे येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या कंपन्यांमध्ये ठेकेदारी पद्धत बंद करून कायम स्वरूपी नोकरी येथील स्थानिक तरुणांना मिळावी यासाठी उठाव करणार आहे. त्याचप्रमाणे भरपुर पाऊस पडुन देखील उन्हाळ्यात माझ्या समाज बांधवांना दोन ते तीन किमी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. आता पर्यंत कोणत्याही खासदार व आमदाराने याकडे लक्ष दिले नाही. मी मात्र माझ्या मायमाऊलीच्या डोक्यावरील हंडा कायमचा कसा उतरेल यासाठी प्रयत्न करणार आहे. वैतरणा धरणात अतिरिक्त शेत जमीन मुळ मालकांना परत मिळण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करील अशी ग्वाही जयप्रकाश उर्फ बाळासाहेब झोले यांनी यावेळी दिली. मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी स्थानिक उमेदवाराला निवडुन द्या असे आवाहन यावेळी जयप्रकाश उर्फ बाळासाहेब झोले यांनी केले. शेतकरी नेते रमेश मामा निसरड, हेमंत झोले, विनोद झोले, विलास झोले, सीमाताई झोले, हनुमंता निसरड, शैलाताई कुंदे, कृष्णा कुंदे, कविता वाघ, इम्रान सय्यद, गणेश घोटकर, रतन नाठे, दिनेश साळुंखे, तुकाराम भगत, संतोष मुसळे, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष जगनराव जगताप, कांतीलाल डहाळे, गणेश रोंगटे, लक्ष्मण डहाळे, काळू भगत, बाळा अहिरे, पिंटू भगत, पंढरी भागडे, भास्कर तातडे, संतोष भोर, गोरख भोर, सागर दालभगत, मयूर दालभगत, ओम भगत, त्र्यंबक डहाळे, बाळा डहाळे, किशोर बिडवे, भूषण सोमवंशी, प्रभाकर चव्हाण, विनोद कडू, योगेश गीते, दीपक तोकडे, नविद शेख, राशीद शेख, जावेद नालबंद, नासिर मणियार, मोसीन सय्यद, शैलेश भगत, कपिल भगत, रंगनाथ आडोळे, सचिन मराडे, बाळा मानवेढे, गणेश लायरे, सागर आडोळे, कृष्णा घारे, संदीप खतेले, राजू कुंदकरिवार, श्रावण मेमाणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.