“स्वराज्य” जिल्हाप्रमुख डॉ. रुपेश नाठे यांच्या नेतृत्वाखाली अवकाळीग्रस्त भागाची पाहणी : बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी प्रशासनाकडून कार्यवाही सुरु

इगतपुरीनामा न्यूज, दि. १० – स्वराज्यप्रमुख संभाजी राजे छत्रपती यांच्या आदेशाने संपर्कप्रमुख करण गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख डॉ. रुपेश हरिश्चंद्र नाठे यांच्या पथकाने इगतपुरी तालुक्यातील गारपीटग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी स्वराज्य पक्षाचे सर्व तालुका पदाधिकारी हजर होते. बळीराजाची परिस्थिती अतिशय वाईट झालेली असून हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. स्वराज्यच्या मावळ्यांनी आज तालुक्यातील सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्हाप्रमुख डॉ. रुपेश नाठे यांच्याशी बोलतांना गोकुळ जाधव या उच्चशिक्षित बीएससी ॲग्री शिक्षण झालेल्या शेतकऱ्याच्या अश्रूंचा बांध फुटला. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे स्वराज्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्याशी बाधित शेतकऱ्यांचा संवाद साधून दिला. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आश्वासन देऊन सर्वांना न्याय मिळवून देण्याचा शब्द दिला. स्वराज्य पक्ष याबाबत नक्कीच पाठपुरावा करणार असल्याचे जिल्हाप्रमुख डॉ. रुपेश नाठे म्हणाले.

तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी स्वराज्यच्या विनंतीला मान देऊन प्रत्येक गावात वस्तुनिष्ठ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. याबद्दल सर्व शेतकरी बांधवांनी त्यांचे आभार मानले. उपजिल्हाप्रमुख डॉ. महेंद्र शिरसाठ यांनी बाधित शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा दिला. याप्रसंगी जिल्हाप्रमुख डॉ. रुपेश हरिश्चंद्र नाठे, उपजिल्हाप्रमुख डॉ. महेंद्र शिरसाठ, तालुकाप्रमुख नारायण भोसले, उपतालुकाप्रमुख सखाराम गव्हाणे, सुनिल भोर, आरोग्य आघाडी रोहीदास जाधव , व्यापारी आघाडी प्रमुख नारायण जाधव, बाळु सरुडे,  रोहीदास टिळे, गणपत शिरसाठ, गणेश सहाणे, शिवाजी कुंदे, बाधित शेतकरी गोकुळ जाधव, मनोज हगवणे, शिवा जाधव, संजय जाधव, गणपत जाधव, रामभाऊ जाधव, प्रफुल्ल जाधव, सदाशिव जाधव, संपत  जाधव, ज्ञानेश्वर जाधव, गणेश जाधव, सचिन जाधव, सतीश जाधव, नामदेव जाधव, संतोष जाधव, धनंजय जाधव, सरपंच पोपट जाधव, हरिष कुंदे,  कैलास गव्हाणे, महेश जाधव, पप्पु शेलार आदी हजर होते.

Similar Posts

error: Content is protected !!