सिन्नर घोटी महामार्गावरील पिंपळगाव मोर ते उंबरकोन फाटा रस्त्यावर तब्बल ४ किलोमीटरची वाहनांची रांग

इगतपुरीनामा न्यूज – सिन्नर घोटी महामार्गावरील पिंपळगाव मोर शिवारात मध्यरात्री आयशर ट्रकमध्ये बिघाड झाल्याने आज सकाळी ८ वाजेपासून वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पिंपळगाव मोर ते उंबरकोन फाटा मार्गावरील ट्रॅफिक मुळे रुग्णवाहिका देखील कसरत करत प्रवास करत आहे. सकाळपासून सुरू असलेल्या वाहनांच्या रांगांमध्ये सिन्नरमार्गे आलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या पोलीस वाहने देखील अडकून पडले आहेत. बिघाड झालेल्या आयशरमागे अर्धा किलोमीटर समृद्धी क्रोसिंगवरील रस्त्यावर दोन दोन फुटांचे खड्डे पडले आहे. विशेष म्हणजे हा रस्ता बनवून महिना देखील झालेला नाही. तो समृद्धीच्या जी. व्ही. पी. आर. कंपनीने केलेल्या रस्त्याचे पितळ उघडे पडले आहे. विस्कळीत वाहतुकीमुळे वाहनधारक वैतागले आहेत.

Similar Posts

error: Content is protected !!