पाडळीजवळ आज पुन्हा अपघात : मुकणे येथील युवक गंभीर जखमी

इगतपुरीनामा न्यूज, दि. १३

मुंबई आग्रा महामार्गावर संबंधित यंत्रणेकडून अद्यापही योग्य उपाययोजना नसल्याने अपघात वाढत आहेत. यामुळे चिंता व्यक्त होत असून पावसाळ्यात अपघातांचे प्रमाण सुद्धा वाढण्याची शक्यता आहे. आज दुपारी एक अपघात झाला असतांनाच सायंकाळी 6 वाजता दुसरा अपघात झाला आहे. MH 15 CW 1483 ह्या क्रमांकाची मोटारसायकल घसरल्याने हा अपघात झाला. नासिककडुन मुंबईच्या दिशेने जात असताना सॅमसोनाईट गोडाऊनजवळ ही घटना झाली. यामध्ये विष्णू निवृत्ती बोराडे वय 35 रा. मुकणे हा युवक गंभीर जखमी झाला आहे. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमीला नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!