इगतपुरीनामा न्यूज – लकीभाऊ जाधव तुम आगे बढो.. हम तुम्हारे साथ है.. येऊन येऊन येणार कोण?.. लकीभाऊ जाधवशिवाय आहेच कोण ? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा विजय असो.. लोकनेते दादासाहेब गुळवे यांचा विजय असो.. अशा अनेकानेक घोषणा देत महाविकास आघाडी इंदिरा काँग्रेसचे उमेदवार लकीभाऊ जाधव यांना गोंदे दुमाला येथे अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. लकीभाऊ जाधव यांची अत्यंत आतुरतेने वाट पाहणाऱ्या मतदारांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे लकीभाऊ जाधव यांच्या प्रचारफेरीचे स्वागत केले. ढोलताशा, संगीतमय गाणी आणि फटाक्यांची आतिषबाजी करीत विजयी जल्लोष साजरा केला. घरोघरी लकीभाऊ जाधव यांनी भेट देत सर्वांचे आशीर्वाद घेतले. इगतपुरी तालुक्यातील औद्योगिक नगरी आणि जागरूक मतदार असणाऱ्या गोंदे दुमाला गावातील मतदारांनी काँग्रेस उमेदवार लकीभाऊ जाधव यांना प्रचंड प्रतिसाद दिल्याने श्री. जाधव यांनी डोळ्यात अश्रू आणून ऋण व्यक्त केले. अक्षरश: तरुणांनी उमेदवार लकीभाऊ जाधव आणि अन्य पदाधिकाऱ्यांना खांद्यावर उचलून घेत आनंदोत्सव साजरा केला. गोंदे दुमाला फाट्यापासून ते संपूर्ण गावातील प्रचार रॅलीत मतदार, युवक, महिला, जेष्ठ नागरिक आणि पदाधिकारी अभूतपूर्व संख्येने सहभागी झाले होते. यावेळी लकीभाऊ जाधव यांनी गावातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले. गरिबांच्या ह्या झोपडीतील मुलाला पदरात घेऊन तीन माजी आमदारांना घरी बसवा, गरीब विरुद्ध श्रीमंत प्रवृत्तीला धडा शिकवा, लोकनेते दादासाहेब गुळवे यांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना माफ करू नका असे आवाहन त्यांनी केले. स्थानिकांना रोजगार, शेतीला पाणी आणि काँग्रेसची गॅरंटी सांगत त्यांनी प्रस्थापित नेत्यांवर टीका केली. परिसरातील नागरिकांनीही त्यांचे अभिवादन स्वीकारत हात उंचावून विजय आपलाच अशी खूण दाखवत पाठिंबा दिला. प्रचार आता अंतिम टप्प्यात येत असताना जागोजागी शक्ती प्रदर्शन पहावयास मिळत आहे. प्रत्येक उमेदवार आपली ताकत दाखविण्याचा प्रयत्न करत असताना काँग्रेसचे उमेदवार लकीभाऊ जाधव यांना मोठ्या प्रमाणात मतदारांचा पाठिंबा बघावयास मिळत असून जागोजागी काँग्रेस, राष्ट्रवादी, उबाठा शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते लकीभाऊ जाधव यांच्या येण्याची चातकाप्रमाणे वाट बघत असल्याचा प्रत्यय सगळीकडे येतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका कार्याध्यक्ष भाऊसाहेब खातळे माजी पंचायत समिती सदस्य रामदास सोनवणे वाडीवऱ्हे गटप्रमुख संपत नाठे, अल्पसंख्यांक सेल तालुकाध्यक्ष अध्यक्ष अमजद पटेल, सुरेश नाठे, बाळू नाठे, अशोक जाधव, दत्तू बोडके, विकी सोनवणे, सनी सोनवणे, रोशन सोनवणे, आकाश सोनवणे व ढोल पथक आदींनी उत्स्फूर्तपणे प्रचाराची आखणी केली होती.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group