वाल्मीक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. १९
महागाईने सर्वसामान्य जनतेचे जीवन व्यथित झालेले आहे. काँग्रेस सरकारच्या काळात पेट्रोलमध्ये पन्नास पैसे वाढले तर आंदोलन करणारे भाजपाचे कार्यकर्ते आणि नेते आता पन्नास रूपयांनी पेट्रोल वाढल्यानंतर कुठे तोंड लपवून बसले आहेत ? घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेल यांचे प्रचंड भाव वाढवून भाजप सरकारने गरीबांचे कंबरडे मोडले आहे. तब्बल एक वर्षापासून शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन केले हे आंदोलन दडपण्यासाठी केंद्र सरकारने अनेक प्रकारे त्रास देण्याचे काम केले. शेतकरी हटले नाही म्हणुन शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम भाजपाने केल्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात म्हणाले. वाढती महागाई व इंधन दरवाढीच्या विरोधात आज जनजागरण अभियानाच्या माध्यमातून काँग्रेस सरकारने गोंदे, वाडीवऱ्हे येथे सभा घेतली. यावेळी ते बोलत होते.
पंतप्रधान मोदींनी आज माघार घेत तीन कायदे मागे घेण्याची घोषणा केली. हा शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा, गरीब जनतेचा विजय आहे. श्री. थोरात पुढे बोलतांना म्हणाले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाच्या दरांत मोठी कपात होऊनही भारतात मात्र पेट्रोलच्या दराने ११० रुपये गाठली असून डिझेलनेही शंभरी पार केली आहे, याकडे लक्ष वेधत श्री. थोरात यांनी खाद्यतेलाच्या वाढत्या दरामुळेही गृहिणींचे बजेट कोलमडल्याचे सांगितले. यावेळी आमदार हिरामण खोसकर म्हणाले की, शेतकऱ्यांच्या शेताची अवकाळी पावसामुळे मोठी हानी झाली. त्यांचे पंचनामे करण्यात यावेत, पिकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांना भरपाई मिळवून द्यावी, वीज कनेक्शन वीज कट न करण्याच्या सूचना कराव्यात अशी मागणी केली.
यावेळी व्यासपीठावर महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार हिरामण खोसकर, जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे, माजी जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद आहेर, माजीमंत्री शोभा बच्छाव, माजी प्रदेश सरचिटणीस संदीप गुळवे, प्रदेश सचिव भास्कर गुंजाळ, माजी सभापती गोपाळ लहांगे, तालुकाध्यक्ष रामदास धांडे, नगरसेवक राहुल दिवे, माजी सभापती संपत काळे, लकी जाधव, महिला अध्यक्ष मनिषा मालुंजकर, ज्ञानेश्वर गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी गोंदे दुमाला येथून मुंबई आग्रा महामार्गापर्यंत रॅली काढुन केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात देऊन निषेध करण्यात आला. याप्रसंगी रमेश जाधव, राजाराम धोंगडे, कचरू पाटील शिंदे, पांडुरंग शिंदे, सरपंच शरद सोनवणे, उपसरपंच परशुराम नाठे, माजी सरपंच कमलाकर नाठे, रघुनाथ खातळे, कारभारी नाठे, उत्तम भोसले, संतोष सोनवणे, गणेश कवठे यांच्यासह प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी, तालुका काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.