इगतपुरीनामा न्यूज – विद्यमान आमदार हिरामण खोसकर हे इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाच्या हितासाठी सातत्याने कार्यरत आहेत. या कार्यतत्पर व्यक्तीच्या पाठीशी उभे राहून सर्वसामान्य लोकांचा विकास होणार आहे. आगरी सेना नेहमीच विकासाची कास धरणाऱ्या विचारांवर काम करीत असते. म्हणून नाशिक जिल्हा आगरी सेनेने महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकर यांना सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. इगतपुरी तालुक्यातील संपूर्ण आगरी समाज श्री. खोसकर यांना मतदान करून पुन्हा एकदा आमदार म्हणून विधानसभेत पाठवेल असा विश्वास आगरी सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रदीप साळवी यांनी माणिकखांब येथे व्यक्त केला. आगरी सेनेचे संस्थापक राजाराम साळवी यांचे विचार आगरी समाजात दमदारपणे पसरले आहेत. त्यांचा मुलगा आणि कार्याध्यक्ष म्हणून मी आगरी समाजाची उन्नती करण्यासाठी महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकर यांना संपूर्ण माहिती सांगितली आहे. त्यावर ते निश्चितपणे चांगले काम करणार असून आगरी समाजाने हिरामण खोसकर यांना मतदान करावे असे ते शेवटी म्हणाले. श्री. खोसकर यांच्या विजयासाठी काम सुरु करीत असून त्यांना पाठिंबा घोषित करीत असल्याचे पत्रक आगरी सेनेने यावेळी काढीत असल्याचे सांगितले. यावेळी आगरी सेनेचे जिल्हा आणि तालुका पदाधिकारी हजर होते.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group