
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी विधानसभेत जनसंवादी पक्षातर्फे उमेदवारी करून जनतेच्या आशीर्वादाने निवडून येणार असल्याचा विश्वास जनसंवादी पक्षाचे उमेदवार अनिल दत्तात्रय गभाले यांनी त्र्यंबकेश्वर येथे व्यक्त केला. त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचाराची सुरुवात करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी अनिल गभाले यांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. अनिल गभाले हे आदिवासी युवा नेतृत्व म्हणून प्रसिद्ध असून त्यांनी उपेक्षित नागरिक आणि सामान्य लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी कायम प्रयत्न केले आहेत. त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यात त्यांच्या कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे चुरस वाढली असल्याचे यावेळी कार्यकर्ते म्हणाले.अनिल गभाले यांच्या प्रचाराला आजपासून दणदणीत सुरुवात झाली. प्रचारावेळी विविध आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून आला मतदारसंघात अनेक ठिकाणी अनिल गभाले यांचे हारतुऱ्यांसह स्वागत आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. अनिल गभाले यांचा विजय असो, अनिल गभाले आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. संपूर्ण मतदारसंघात प्रचाराचे नियोजन करण्यात आले असून नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या जाणार असल्याचे अनिल गभाले यांनी सांगितले.