नागोसली येथील ४४ गरजू नागरिकांच्या घरांचे स्वप्न होणार पूर्ण

इगतपुरीनामा न्यूज – गरीब आणि आदिवासी कुटुंबाचे स्वप्न म्हणजे हक्काचे घर. गरिबांच्या डोक्यावर हक्काचे छप्पर मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायत सक्षमतेने काम करतांना दिसते आहे. विविध योजनांच्या माध्यमातून नागोसली येथील गरजू नागरिकांच्या स्वत:च्या टुमदार घराचे स्वप्न साकार करता आले आहे. यामुळे ह्या सर्व कष्टकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मोलाची मदत मिळणार आहे. लाभार्थी नागरिकांनी नागोसलीचे सरपंच काशिनाथ होले उपसरपंच अशोक शिंदे आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे ऋण व्यक्त केले आहेत. महागाई, गरिबीच्या परिस्थितीमुळे आम्हा काबाडकष्ट करणाऱ्यांचे घराचे स्वप्न हे स्वप्नच राहून जात होते. ग्रामपंचायतीने केलेल्या सहाय्यामुळे हे स्वप्न पूर्ण झाले. याबद्धल नागरिकांनी सर्वांचे आभार मानले. याआधीच्या अनेक वर्षात गरिबांसाठी घरकुल मिळाले नाहीत. मात्र गेल्या काही महिन्यातच आमच्या नागरिकांना ह्याचा फायदा झाला अशी प्रतिक्रिया पंढरी शंकर होले यांनी दिली. नागोसली येथे ३७ घरकुल मंजूर असून यापैकी ५ कामे पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. ३२ नागरिकांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे. अन्य योजनेतून ७ घरकुलांचे काम सुरु असून २ कामे पूर्ण होत आले आहे. २ जणांना धनादेश देण्यात आले आहेत असे उपसरपंच अशोक शिंदे यांनी सांगितले.

error: Content is protected !!