इगतपुरीनामा न्यूज – आमचा उमेदवार सर्वसामान्य आणि आदिवासी माणसाच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी थेट देशाच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यापर्यंतही अनेकदा जाऊन लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडायचे काम आमच्या लकीभाऊ जाधव ह्या उमेदवाराने केलेले आहे. म्हणूनच इंदिरा काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि वरिष्ठ नेत्यांनी इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील इंदिरा काँग्रेसने लकीभाऊ जाधव यांना मैदानात उतरवले आहे. लकीभाऊ जाधव आमदार म्हणून निवडून आल्यावर इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील प्रत्येक गावाचा अभूतपूर्व कायापालट करू शकतात. म्हणूनच त्यांना सर्वत्र मोठा पाठिंबा मिळत असून ह्या मतदारसंघावर काँग्रेसचा झेंडा फडकेल असा आत्मविश्वास इंदिरा काँग्रेसचे इगतपुरी तालुकाध्यक्ष रामदास धांडे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सचिव उमेश खातळे, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवसेना नेते हरिदास लोहकरे यांनी व्यक्त केला आहे. जो व्यक्ती देशाच्या सर्वोच्च व्यक्तीला भेटून सामान्य माणसाच्या समस्या मांडू शकतो तो व्यक्ती आमदार म्हणून निवडून आल्यास क्रांती उभी करील अशी लोकभावना आदिवासी समाजात व्यक्त होत आहे. यामुळे सध्याच्या परिस्थितीत काँग्रेसचे उमेदवार लकीभाऊ जाधव यांचे पारडे जड भरल्याचे दिसून येत आहे.
इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील इंदिरा काँग्रेसचे उमेदवार लकीभाऊ जाधव हे युवा नेतृत्व सर्व आदिवासी क्रांतीकारकांच्या विचारांनी झपाटलेले आहे. आपला प्रत्येक दिवस त्यांनी सामान्य माणसे आणि आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी त्यांनी व्यतीत केलेला आहे. गरीब कुटुंबातील लकीभाऊ जाधव हा युवक देशपातळीवर नेतृत्व करतोय. इंदिरा काँग्रेसने त्याच्यातील क्षमता ओळखून त्याला उमेदवारी दिलेली आहे. भारताच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांच्यापर्यंत लोकांच्या समस्या आणि प्रश्न पोटतिडकीने मांडून त्या सोडवण्यासाठी हा युवक सक्रिय जनसेवेत आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनाही भेटून लोकांच्या अडचणी दूर करण्यात त्याचा सहभाग आहे. इगतपुरी मतदारसंघातील लकीभाऊ जाधव हा इंदिरा काँग्रेसचा उमेदवार सोडून अन्य कोणीही उमेदवार राष्ट्रपती दालनापर्यंत सुद्धा पोहोचलेला नाही. संपूर्ण मतदारसंघाला नंदनवन करून विकसित करण्यासाठी लकीभाऊ जाधव यांच्याशिवाय पर्याय नाही. म्हणूनच सर्वांनी लकीभाऊ जाधव यांना इगतपुरीतुन निवडून देणार असल्याचा निर्धार केला असल्याचे सर्वांनी सांगितले.