भाम धरणात आंघोळीला गेलेला युवक बुडाला : घोटी पोलिसांकडून तपास आणि मदतकार्य सुरु

इगतपुरीनामा न्यूज, दि. 7

इगतपुरी तालुक्यातील काळूस्ते येथील एक युवक भाम धरणाच्या सांडव्याच्या पाण्यात सकाळच्या सुमारास बुडाला असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. हा युवक आंघोळीसाठी गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाल्याबाबत प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थ सांगतात. शरद मंगळू पोकळे असे त्या युवकाचे नाव असल्याचे उपस्थित लोकांनी सांगितले. बुडालेला युवक हाच आहे की अन्य कोणी आहे यासंदर्भातची माहिती शोध पूर्ण झाल्यावर समजणार आहे. गेल्या तीन तासांपासून या युवकाचा शोध सुरू असून अद्याप तपास लागलेला नाही. घोटी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु झाला आहे. धरणाजवळ नातेवाईक आणि गावकऱ्यांनी गर्दी केली आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!