इगतपुरीनामा न्यूज, दि. १२
गेली ५ वर्ष पंचायत समिती पदाधिकारी म्हणून सर्व सदस्यांनी प्रशासनाला परिपूर्ण साहाय्य केले. यामुळे सामान्य माणसाची कामे व्हायला चांगली मदत झाली. त्यामुळे सर्व पंचायत समिती पदाधिकाऱ्यांची कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन इगतपुरीचे बालविकास प्रकल्पाधिकारी पंडित वाकडे यांनी केले. १३ मार्चला विद्यमान पंचायत समिती सदस्यांची मुदत संपत आहे. ह्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती प्रशासनाने मावळत्या सदस्यांचा सन्मान करून आभार मानले. यावेळी पंडित वाकडे बोलत होते. यावेळी सर्व लोकप्रतिनिधींनी प्रशासनाने केलेल्या सहकार्याचा उल्लेख करून आभार मानले.
गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी अमित भुसावरे, सर्व विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी गुणवंत कर्मचारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी कर्मचारी यांचा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. एकात्मिक बालविकास प्रकल्पातर्फे यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा सप्रेम भेट देण्यात आली. प्रतिमा वितरण इगतपुरी बालविकास प्रकल्पाधिकरी पंडित वाकडे, सहाय्यक बालविकास प्रकल्पाधिकारी वंदना सोनवणे, पर्यवेक्षिका ज्योती काळे, हर्षदा कुवर, ललिता चौधरी, पूर्वा दातरंगे, नीलम बांबळे, सुखदा पाराशरे, अलका खांदवे यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी मावळते सभापती सोमनाथ जोशी, उपसभापती विठ्ठल लंगडे, पंचायत समिती सदस्य भगवान आडोळे, जिजाबाई नाठे, जया कचरे, विमल गाढवे, विमल तोकडे, कौसाबाई करवंदे, कल्पना हिंदोळे, मच्छिंद्र पवार यांचा सन्मान करून निरोप देण्यात आला.