हिरामण खोसकरांना दुसऱ्यांदा आमदार करण्यासाठी जनतेने हाती घेतली निवडणूक : महाविकासच्या उमेदवारी घोळामुळे खोसकरांना मिळतोय फायदा : लवकर उमेदवारीमुळे हिरामण खोसकरांनी घेतली आघाडी

इगतपुरीनामा न्यूज – महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातर्फे विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांची उमेदवारी जलदगतीने घोषित झालेली आहे. मात्र महाविकास आघाडीतील इंदिरा काँग्रेसने अद्यापही उमेदवाराची घोषणा केलेली नाही. लोकसभा निवडणुकीत महायुतीने उमेदवार घोषित करायला वेळ लावला होता. शिवसेना ठाकरे गटाने जलद उमेदवार निश्चित केल्याचा फायदा मतदानात दिसून आला. हिरामण खोसकर यांनी प्राप्त परिस्थितीचा चांगलाच फायदा करून घेतला आहे. गावोगावी वाड्या पाड्यांवर प्रचार यंत्रणा आणि कार्यकर्त्यांची फौज लावून आघाडी घेतल्याचे दिसते. कार्यकर्त्यांनीही हिरामण खोसकर यांची निवडणूक स्वतःच्या हाती घेतली असून ही निवडणूक जणू काही जनतेनेच हाती घेतल्याचे दिसून येते. परिणामी हिरामण खोसकर यांचे पारडे बरेच जड झाले असून प्रत्येक गाव, वाड्या, वस्त्या पिंजून काढत प्रत्येक मतदाराला भेटण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा घोळ हिरामण खोसकर यांच्या पथ्यावर पडला असल्याने ह्याचा पुरेपूर फायदा घेतला जातोय. इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सूक्ष्म नियोजन करून हिरामण खोसकर यांना सलग दुसऱ्यांदा विधानसभेत पाठवण्याचे ध्येय निश्चित केले आहे. महाविकास आघाडीला प्रचाराला कमी कालावधी मिळणार असल्याने याचा फायदा महायुतीने उठवला आहे. उद्या शुक्रवारी हिरामण खोसकर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यासाठीही आज सर्व कार्यकर्त्यांनी मतदारसंघात प्लॅनिंग केले आहे. 

इगतपुरी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांना तिकीट मिळाले आहे. त्यापूर्वीच त्यांनी आपली यंत्रणा कामाला लावून विजयी होण्याचा निर्धार केलेला आहे. यासाठी दोन्हीही तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, मंडळाचे पदाधिकारी यांच्याशी समन्वय साधण्यात आला. सर्वांना एकाच विचारधारेत गुंफुन येणाऱ्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी सर्वांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या. अन्य पक्षातील नाराज कार्यकर्त्यांना खोसकरांच्या प्रवाहात आणून अधिकाधिक मतांनी विजयाचा संकल्प करण्यात आला. उमेदवारी लवकरच घोषित झाल्यामुळे नियोजन करायला सोपे गेले. दुसरीकडे महाविकास आघाडीने अजूनही उमेदवारीचा घोळ घातलेला आहे. लोकसभेत विजयी उमेदवाराला लवकर तिकीट घोषित करण्याचा फायदा झाला होता. यावेळी लवकर उमेदवारी जाहीर केल्याचा संपूर्ण फायदा खोसकर यांना झाला आहे. सर्व मतदारसंघात आमदार हिरामण खोसकर यांनी स्वतः जातीने लक्ष घालत कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्यांदा विधानसभा गाठायाचीच असे निश्चित केलेले आहे. माणसाला माणूस जोडून प्रचारयंत्रणा काम करीत असल्याचे दिसते. ग्रामीण मतदारांनी ही निवडणूक स्वतः हाती घेतली असून ह्यावेळी आमदार खोसकर दुसरी टर्म आमदार म्हणून निवडून येतील असा विश्वास सर्वांकडून व्यक्त होतो आहे. उद्या शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. यासाठी आज कार्यकर्ते कामाला लागले आहेत. 

Similar Posts

error: Content is protected !!