इगतपुरीनामा न्यूज, दि. १६
इगतपुरी तालुक्यासाठी आजचा दिवस सर्वोत्कृष्ट बातमी घेऊन आला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर अत्यंत कमी असणारी एक आकडी रुग्ण संख्या असणारा आजचा दिवस आहे. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या शासकीय अहवालानुसार आज फक्त आणि फक्त ४ व्यक्तींचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
आज आलेली दुसरी बातमी सुद्धा अत्यंत आनंदाची आहे. आज एकाच दिवशी ४३ कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींनी कोरोनावर विजय मिळवला आहे. कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आज दिवस अखेर फक्त १४५ कोरोना बाधित व्यक्तींवर उपचार सुरू आहेत अशी माहिती इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी दिली.
सध्या कोरोनाची धास्ती सर्वांनाच आहे.. अगदी कोणतेही उपचार घ्यायची लोकांची तयारी आहे, अशा परिस्थितीत किफायतशीर दरात उपलब्ध असलेलं बर्फानी आरोग्य प्लस हे आयुर्वेदिक प्रतिबंधक औषध आहे. रुग्णांसाठी बर्फानी आरोग्य प्लस म्हणजे फक्त औषध नाही, तुमच्या प्रियजणांसाठी ते सुरक्षा कवच आहे ! 7030288008
इगतपुरी तालुक्यात अवघे ४ कोरोना बाधित व्यक्ती आढळून आले ही बातमी आशेचा किरण वाढवणारी आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी रात्रीचा दिवस करणारे माझे सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी कर्मचारी आदींचे हे यश आहे. आगामी काळात इगतपुरी तालुका कोरोनामुक्त होण्यासाठी नागरिकांनी नियम पाळावेत, लसीकरण करावे. म्हणजे आपल्याला लवकरात लवकर उद्धिष्ट साध्य करता येईल.
- डॉ. एम. बी. देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी, इगतपुरी