इंदिरा काँग्रेसकडून तुल्यबळ उमेदवार लकीभाऊ जाधव यांना तिकीट देण्याची मागणी : राज्यपातळीवरील युवकांचे सक्षम नेतृत्व लकीभाऊला संधी द्या

इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातील आदिवासी समाजाशी घनिष्ठ संबंध, आक्रमक नेतृत्व, प्रश्न व समस्या सोडवण्याची हातोटी, युवकांशी दैनंदिन संवाद आणि सर्व समाजाला सोबत घेऊन काम करण्याची क्षमता हे लकीभाऊ जाधव यांचे गुणवैशिष्ठ्य आहे. आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून देशपातळीवर पोहोचलेले हे युवा नेतृत्व युवकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातून इंदिरा काँग्रेस पक्षातर्फे त्यांनी उमेदवारी मागितली आहे. बदललेल्या राजकीय परिस्थितीत त्यांच्या उमेदवारीचा दावा सध्या क्रमांक एकवर आहे. काँग्रेसतर्फे उमेदवारी मिळाल्यास लकीभाऊ जाधव हे खरोखर जिंकण्याची क्षमता असणारे प्रबळ उमेदवार आहे. मतदारसंघात आदिवासी समाजासोबतच प्रत्येक समाजाशी त्यांचा चांगला सलोखा त्यांना विधानसभेत घेऊन जाऊ शकतो. इगतपुरी मतदारसंघाच्या विकासाचे व्हिजन असलेले लकीभाऊ जाधव हे काँग्रेसचे तुल्यबळ उमेदवार ठरू शकतात. मतदारसंघ आणि राज्यभरातून त्यांची प्रचारयंत्रणा त्यांच्या विजयासाठी रात्रीचा दिवस करणार आहे. इंदिरा काँग्रेसतर्फे त्यांच्या उमेदवारीवर अंतिम निर्णय लवकरच अपेक्षित असून युवकांची फळी या क्षणाची वाट पाहत आहे. 

गरीब कुटुंबातून असल्याने लकीभाऊ जाधव यांना आदिवासी समाज आणि अन्य समाज यांच्या विविध समस्यांची जाण आहे. आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून त्यांनी लोकांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी मोठी कामगिरी केलेली आहे. विविध आक्रमक आंदोलने, शैक्षणिक प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी कामे आणि विकासासाठी यशस्वी लढा त्यांनी दिलेला आहे. २०१९ ला वंचित बहुजन आघाडीतर्फे इगतपुरी मतदारसंघात त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. इंदिरा काँग्रेसमध्ये सक्रिय सहभागी होऊन त्यांनी इगतपुरी मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून आग्रही मागणी केलेली आहे. राज्यभरात युवकांचे सक्षम नेतृत्व म्हणून ओळखले जातात. इगतपुरी मतदारसंघातील विविध समाजाशी त्यांचा चांगला संपर्क असून त्यांच्या विजयासाठी ह्याचा फायदा होऊ शकतो. सध्याच्या परिस्थितीत काँग्रेस पक्षाने लकीभाऊ जाधव यांनाच रिंगणात उतरवणे आवश्यक आहे. विरोधक उमेदवाराशी तुल्यबळ लढा देण्यासाठी लकीभाऊ जाधव हे सज्ज झालेले आहेत. इंदिरा काँग्रेसने अशा लढाऊ आणि व्हिजन असलेल्या लकीभाऊ जाधव यांनाच उमेदवारी द्यावी असा सुरु सगळीकडे व्यक्त होत आहे. येत्या काही दिवसात उमेदवाराचे नाव जाहीर होईल अशी आशा आहे.

Similar Posts

error: Content is protected !!