
इगतपुरीनामा न्यूज – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरेवाडी येथील उपक्रमशील शिक्षिका वंदना एकनाथ सोनार पोतदार यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा समिती नाशिक महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार वितरित करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच नाशिक प्रदान करण्यात आला. नाशिक ग्रामीण शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, मुंबईचे मुद्रांक जिल्हाधिकारी भरत गरुड, मनपा शिक्षणाधिकारी बापुसाहेब पाटील, के. के. वाघ युनिव्हर्सल स्कुलचे प्राचार्य डॉ. अमृता राव यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. यावेळी संस्थेचे संस्थापक अनिल निरभवणे, सचिव नाना उलारे, सल्लागार यु. के. अहिरे, अनिल शिरसाठ, सुनिल आरणे, रावसाहेब पगार, डॉ. श्रीनिवास पोतदार उपस्थित होते. वंदना सोनार अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अतिदुर्गम भागातील दरेवाडी येथील पत्र्याच्या शेडमधील शाळेतून गुणवत्तापूर्ण ज्ञानदानाचे कार्य अखंडपणे करीत आहेत. त्यांनी तळोघ, काळुस्ते या पेसा क्षेत्रांतील शाळांमधुनही विद्यार्थ्यांमध्ये दर्जेदार भविष्यवेधी शिक्षणाची रूजवणूक केली आहे. त्यांना मिळालेल्या या राज्य आदर्श पुरस्काराबद्दल इगतपुरीचे गटशिक्षणाधिकारी, सर्व विस्ताराधिकारी, सर्व केंद्रप्रमुख, सर्व शिक्षक, इगतपुरी तालुक्यातील विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, आप्तेष्ट व शिक्षक मित्र परिवाराने श्रीमती सोनार यांचे अभिनंदन केले आहे.