
इगतपुरीनामा न्यूज – आरोपी विजय खन्ना याचा २८ ते ३० ऑगस्टला ७९७७३८०१९८ आणि ८३७४६१९८२७ या नंबरवरून व्हॉटस अप कॉल येवुन त्यात आम्ही सीबीआय मधुन पोलीस अधिकारी बोलत असल्याचे त्याने खोटे सांगितले. फिर्यादीला त्याची सर्व माहिती विचारून तुमच्या विरूध्द कॅनरा बँकेत मनी लॉन्ड्रींगची केस दाखल आहे. तुम्ही नरेश गोयल यांच्यासोबत मिळुन ७ कोटीची मनी लॉन्ड्रींग केलेली आहे. याबाबत कोणाला काही माहिती दिली तर तुमचे कुटुंबाला त्रास होईल अशी खोटी धमकी देऊन घाबरून दिले. व्हॉटसअप कॉल, स्काईप अँप व्हिडीओ कॉल करून तुम्हाला केसमध्ये मदत करू असे खोटे सांगितले. त्यासाठी त्याने भारतीय स्टेट बँके शाखा गुरगाव खाते क्रमांक 41103864856 यावर १२ लाख रुपये टाकण्यास सांगितले. त्यानुसार कुटुंबाला त्रास होईल म्हणुन भारतीय स्टेट बँक शाखा इगतपुरीच्या ११५४२१६६६४९ या खात्यावरून फिर्यादीने धनादेशाने १२ लाख रुपये टाकले. मात्र आपली फसवणुक झाल्याचे समजताच रामप्रताप रामदेव यादव, वय ७६ रा. धम्मगिरी इगतपुरी यांनी इगतपुरी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. पोलिसांनी फिर्यादीनुसार संशयित आरोपी विजय खन्ना, राहुल गुप्ता, रेखा मॅडम ( पुर्ण नाव, पत्ता माहीत नाही ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. माहिती आणि तंत्रज्ञान कायदा २००५ चे कलम ६६ (क),६६ (ड) आणि भा. न्या. स. कलम २०४,३१८(४) नुसार हा गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांनी कसून तपास सुरु केला आहे.