‘महिलांनी घडविलेला महाराष्ट्र’ या विषयावर निवेदिका क्ष‍िप्रा मानकर यांचे व्याख्यान ; आज सायंकाळी 7 वाजता फेसबुक लाईव्ह कार्यक्रम

इगतपुरीनामा न्यूज, दि. 30 : सुप्रसिद्ध निवेदिका जिजाऊ ब्रिगेड प्रदेश प्रसिद्धीप्रमुख महाराष्ट्रभर गाजलेल्या झुंजार व्याख्यात्या महिला प्रबोधनकार क्षिप्रा मानकर यांचे ‘महिलांनी घडविलेला महाराष्ट्र’ या विषयावर आज शुक्रवार दिनांक 30 एप्रिल 2021 रोजी महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे 38 वे पुष्प गुंफणार आहेत. महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेली 60 वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने 19 मार्च 2021 पासून “महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला” सुरु आहे. या व्याख्यानमालेत 30 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता क्ष‍िप्रा मानकर या ‘महिलांनी घडविलेला महाराष्ट्र’ या विषयावर विचार मांडणार आहेत

क्षिप्रा मानकर यांच्याविषयी
मुळच्या अमरावतीच्या असणा-या क्ष‍िप्रा मानकर या उत्कृष्ट निवेदिका, समुपदेशक म्हणुन या प्रसिद्ध आहेत. अमरावती विद्यापीठातून बी.एस.सी.पुर्ण केले. यासह त्यांनी पत्रकारीतेत, समाजकार्य या विषयात पदवीत्तोर शिक्षणपुर्ण केले. अमरावतीतील स्थानिक आरसीएन या डिजीटल माध्यमांच्या त्या संचालक आहेत. त्यांनी अमरावतीमधील राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा स्त्री रूग्णालय, जिल्हा सामान्य रूग्णालय (असंर्गजन्य रोग नियंत्रण अभियान) समुपदेशक म्हणुन काम केलेले आहे. त्यांनी अनेक विषयांवर व्याख्याने देत असतात.
श्रीमती मानकर यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये अमरावती विद्यापीठाचा उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेविका पुरस्कार, उत्कृष्ट एनएसएस फर्स्ट कलर होल्डर पुरस्कार, उत्कृष्ट वक्ता पुरस्कार असे विविध पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.
समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण
आज शुक्रवार दि. 30 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी 7 वाजता परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल, फेसबुक आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राचे ‍मराठी ट्विटर हँडल वरून आणि खाली दिलेल्या कोणतीही लिंकचा वापर करून लाईव्ह पाहता येईल.

https://twitter.com/MahaGovtMichttps://twitter.com/MahaGovtMic

https://twitter.com/MahaMicHindi

https://twitter.com/micnewdelhi

https://www.facebook.com/MICNEWDELHI

https://www.facebook.com/micnewdelhiPR/

https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share

https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhi

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!