पदवीधर विद्यार्थ्यांना विविध नोकरीच्या संधी आहेत. ह्या संधींचे सोने करून घवघवीत यश मिळवण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन उपयुक्त ठरते. हजारो विद्यार्थ्यांना यशस्वी मार्गदर्शन करणारे लोकप्रिय व्यक्तिमत्व प्रा. देविदास गिरी यांच्या खालील मार्गदर्शनाचा नक्की फायदा घ्यावा.
मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरी
उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय
संपर्क : 9822478463
■ बँकिंग व वित्तीय क्षेत्र
आज बँकिंग व वित्तीय क्षेत्रामध्ये पदवीधर युवकांना करिअर करण्यासाठी भरपूर संधी उपलब्ध आहेत. बेरोजगारीच्या परिस्थितीमध्ये या संधींचा युवकांनी फायदा करून घेणे खूप महत्वाचे आहे. कोणत्याही शाखेच्या पदवीधर विद्यार्थ्याला या क्षेत्रामध्ये करिअर करता येते. यासाठी या क्षेत्रातील परीक्षांची चांगल्या प्रकारे तयारी करणे गरजेचे आहे. परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम समजावून घेतला की उत्तम तयारी करता येते.
■ लिपिक वर्गातील कनिष्ठ सहयोगी
भारतीय स्टेट बँकेत ( SBI ) लिपिक वर्गातील कनिष्ठ सहयोगी ( ग्राहक मदत आणि विक्री ) या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण ५१२१ रिक्त जागांसाठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
■ बँकेचे संकेतस्थळ
रिक्त पदांचा तपशील, पात्रतेच्या अटी, नियम आणि अटी आणि ऑनलाईन अर्जासाठी बँकेच्या https://www.sbi.co.in/careers किंवा https://bank.sbi/careers- “Latest Announcement/Current Openings” या संकेतस्थळाला भेट द्या. उमेदवारांना त्यावर उपलब्ध असलेल्या लिंकद्वारे अर्ज करता येईल.
■ अंतिम मुदत
अर्जाचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि फी भरण्याची अंतिम मुदत १७ मे २०२१ ही आहे. या पदासाठी ऑनलाईन Preliminary and Main exam घेतली जाईल.
■ Preliminary Examination
ही परीक्षा ऑनलाईन असून Objective स्वरूपाची असेल. १०० मार्कांची ही परीक्षा 1 तासाची असून 3 विभागांवर प्रश्न विचारले जातील. हे तीन विभाग पुढील प्रमाणे असतील :
०१. English Language 30 प्रश्न, 30 मार्क, 20 मिनिटे वेळ.
०२. Numerical Ability 35 प्रश्न, 35 मार्क, 20 मिनिटे वेळ.
०३. Reasoning Ability 35 प्रश्न, 35 मार्क, 20 मिनिटे वेळ. यात बँकेने ठरविलेल्या नियमाप्रमाणे मार्क मिळाल्यास मुख्य परीक्षेला बसता येईल. ऑनलाईन प्रिलिमिनरी परीक्षेची तारीख (अंदाजे ) जून 2021 मधील विविध तारखा.
■ Main Examination
ही परीक्षा ऑनलाईन असून २०० मार्कांची असेल. वेळ 2 तास 40 मिनिटांचा असेल. ही परीक्षा 4 विभागांवर असून हे विभाग पुढीलप्रमाणे होय.
०१. General/Financial Awareness 50 प्रश्न, 50 मार्क, 35 मिनिटे वेळ.
०२. General English 40 प्रश्न, 40 मार्क, 35 मिनिटे वेळ.
०३. Quantitative Aptitude 50 प्रश्न, 50 मार्क, 45 मिनिटे वेळ.
०४. Reasoning Ability and Computer Aptitude 50 प्रश्न, 60 मार्क, 45 मिनिटे वेळ.
याप्रमाणे परीक्षेचे स्वरूप असेल.
■ महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे
महाराष्ट्रामध्ये या परीक्षेची टेन्टेटिव्ह केंद्रे अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सोलापूर ही आहेत.
■ इतर महत्वाचे
उमेदवारांनी वयोमर्यादा, आरक्षण, निवड प्रक्रिया, कॉल लेटर , सर्वसामान्य सूचना, फी, वेतन आदी माहीती वर दिलेल्या संकेतस्थळावर बँकेने अतिशय सविस्तर दिलेली असून उमेदवारांनी या माहीतीचे काळजीपूर्वक अवलोकन करून अर्ज करावा व माहिती घ्यावी.
■ भरपूर तयारी करा
बँकिंग व वित्तीय क्षेत्रामध्ये उमेदवारांना अनेक संधी उपलब्ध असून जाहिरातीची माहिती मिळविणे, पात्रताविषयक अटींची माहिती करून घेणे, वेळेत ऑनलाइन अर्जाची पूर्तता करणे, अभ्यासक्रमाचे स्वरूप, प्रश्नपत्रिकांची संख्या, अभ्यासक्रमातील घटक, गुण विभागणी या सर्व गोष्टींची माहिती मिळवा तसेच भरपूर तयारी करा. यश तुमचेच आहे हे लक्षात ठेवा.
( लेखक इगतपुरी येथील केपीजी कॉलेजचे उपप्राचार्य असून स्पर्धा परीक्षांचे लोकप्रिय मार्गदर्शक आहेत. )
5 Comments