सायन्स ऑन व्हील- मुंबई येथील फिरते म्युझियम रविवारी मुंढेगांवच्या आश्रमशाळेत

इगतपुरीनामा न्यूज – मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे फिरते म्युझियम रविवारी ११ ऑगस्टला मुंढेगाव शासकिय इंग्रजी माध्यम निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या भेटीला येत आहे. “जर तुम्ही वस्तुसंग्रहालयापर्यंत येऊ शकत नसाल तर वस्तुसंग्रहालय तुमच्यापर्यंत येईल” अशी टॅगलाईन असलेले हे फिरते म्युझियम विद्यार्थ्यांना पहायला मिळणार आहे अशी माहिती आश्रमशाळेचे मुख्याध्यापक तनवीर जहागिरदार यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय हे देशातील प्रमुख कला व ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय आहे. १९०९ मध्ये स्थापन झालेल्या ह्या वस्तुसंग्रहालयाला एवार्ड ऑफ एक्सलन्स हा जागतिक पुरस्कार मिळाला आहे. आठ वर्षापुर्वी वस्तुसंग्रहालयाने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी फिरते संपर्क अभियान सुरु केले आहे. या अंतर्गत संस्थेने दोन बसेसची व्यवस्था केली असुन ग्रामीण, शहरी भागात या बसेसमध्ये विविध विषयांवर वेळोवेळी बदलणारी प्रदर्शने भरवली जातात. या बसेस वातानुकुलीत असुन यामध्ये कलाकृतींचे प्रदर्शन, शोकेश, दृकश्राव्य साधने, इंटरऍक्टिव्ह डेमो, डिजीटल माध्यमयुक्त साधने उपलब्ध आहेत. विकलांग व्यक्तींना रॅम्य व व्हिलचेअरची सुविधा या बसेसमध्ये आहे. विविध शाळा, महाविद्यालय, संस्था आदी ठिकाणी सर्व प्रदर्शने व त्यासोबतचे कार्यक्रम विनामुल्य उपलब्घ असतात. ही बस आपल्या शाळेत येण्यासाठी mow@Csmvs.in या मेलवर नोंदणी करावी लागते. त्यानंतर सोईनुसार बस आपल्या शाळेत पोहचेल.

Similar Posts

error: Content is protected !!