नाशिकच्या तरुण गाढे आणि मंगेश लोखंडे यांची सहाव्या राष्ट्रीय एसडीपीएफ क्रीडा स्पर्धेत उत्तुंग भरारी

इगतपुरीनामा न्यूज : नाशिक शहरातील मातोश्री मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल येथे सहाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 7 ते 9 जून या तीन दिवसांची ही क्रीडा स्पर्धा असून यात पहिल्याच दिवशी झालेल्या कबड्डी लीग सामन्यात महाराष्ट्राने सुवर्ण पदक पटकावले आहे. ओडिशासोबत झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या संघातील नाशिकच्या तरुण गाढे आणि मंगेश लोखंडे यांनी उल्लेखनीय कामगिरी करत यशाला गवसणी घातली.

त्यांचा उत्तम खेळ बघून कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख अतिथी आयकर आयुक्त डॉ.रविराज खोगरे, आणि त्यांच्या पत्नी IIFL फाऊंडेशनच्या डॉ. चेतना खोगरे यांनी तरुण आणि मंगेश या दोन्ही खेळाडूंचे कौतुक करत मार्गदर्शन केले व भविष्यातील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.

डॉ.निलेश राणे युवा प्रतिष्ठान, नाशिक आणि स्कूल डेव्हलपमेंट अँड प्रमोशन फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

राया स्पोर्ट्स क्लब आणि श्री साई स्पोर्ट्स क्लब मधील प्रशिक्षक, पालक तसेच डॉ. निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांनी या खेळाची तयारी केली आहे. तसेच इराया फाऊंडेशन, स्कूल स्पोर्ट्स अँड युथ वेल्फेअर असोसिएशन यांचे देखील सहकार्य या विद्यार्थ्यांना लाभले आहे. भविष्यात देशासाठी खेळण्याचे ध्येय उराशी बाळगून अधिकाधिक मेहनत करणार असल्याचे या विद्यार्थ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Similar Posts

error: Content is protected !!