इगतपुरीनामा न्यूज – अल्पवयीन मुलीला फूस लावून, कटकारस्थान करून पळवून नेल्याबद्दल संबंधितांवर गुन्हे दाखल करावे या मागणीचे निवेदन शिवशाही संघटनेचे अध्यक्ष ॲड. रोहित उगले यांनी इगतपुरीचे नायब तहसीलदार अनिल मालुंजकर यांना दिले आहे. निवेदनात नमूद आहे की, इगतपुरी तालुक्यातील आडवण येथील नयन गोरख लहाने या युवकाने ८ एप्रिलला रात्री ११ वाजेच्या सुमारास आडवण गावातीलच एका अल्पवयीन मुलीला फुस लावुन पळवून नेले. या घटनेला पावनेदोन महिने झाले तरी या अल्पवयीन मुलीचा अद्याप पर्यंत शोध लागलेला नाही. घरातील मंडळीनी इगतपुरी पोलीस ठाण्यात तक्रार केली असून सुद्धा त्याबाबत कुठल्याही प्रकारची हालचाल दिसत नाही. मुलीचे आजोबाही वारंवार इगतपुरी पोलीस ठाण्यात चकरा मारूनही नातीचा शोध न लागल्याने व्याकूळ झालेले आहेत. ह्या घटनेमध्ये मुलगा, त्याचा मित्रपरिवार आणि नातेवाईकांचा सुद्धा सहभाग असल्याचे दिसत आहे. संबंधितांची कसून चौकशी करण्यात येऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कठोर शिक्षा करावी. त्यामुळे इगतपुरी तालुक्यात अशा घटनांना आळा बसून अल्पवयीन मुलींचा जीवन व दर्जा सुधारून तालुक्याचे नाव खराब होणार नाही. सदर अल्पवयीन मुलीचा शोध न लागल्यास शिवशाही संघटना तीव्र आंदोलन करेल. मग होणाऱ्या परिणामाला सामोरे जावे लागेल. हे राज्य छत्रपतींचे असुन शिवशाही संघटना अशा प्रकारे अन्याय कधीही सहन करणार नाही असा इशारा शिवशाही संघटनेचे अध्यक्ष ॲड. रोहित उगले यांनी निवेदनात दिला आहे. याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात सदर संबंधित संशयितांच्या विरोधात भादवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल असुन पोलीस त्याचा कसुन शोध घेत आहेत.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group