
इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती संघ संचलित संजीवनी माध्यमिक आश्रमशाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. शिवम सुरेश माळी याने ७७ टक्के मिळवून आश्रम शाळेत प्रथम, सोहम रोहिदास भिडे याने ७४ टक्के मिळवून आश्रमशाळेत द्वितीय तर यश रामजी मोरे याने ७० टक्के मिळवून आश्रमशाळेत तृतीय क्रमांक पटकावला आहे. २६ पैकी एक विद्यार्थी विशेष प्राविण्य (डिस्टिंक्शन) श्रेणीत तर आठ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा प्रमिला गोस्वामी, जनरल सेक्रेटरी प्रणिता भारती, संस्थेचे विश्वस्त विशाल भारती, मुख्याध्यापक मनोज गोसावी आदींनी अभिनंदन केले आहे.