रासेयोच्या मदतीने ग्रामीण जनतेची सेवा करण्याची विद्यार्थ्यांना संधी : प्राचार्य भाबड

इगतपुरीनामा न्यूज, दि. २४

राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील प्रश्नांचा अभ्यास करून ते प्रश्न कसे सोडविता येतील याचा विचार करावा. ग्रामीण जनतेची चांगल्या प्रकारे सेवा करावी असे प्रतिपादन गोवर्धने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांनी केले.

इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वर्धापनदिन कार्यक्रमात प्राचार्य डॉ. भाबड बोलत होते. याप्रसंगी साथी या सामाजिक संस्थेचे कार्यक्रम अधिकारी प्रमोद बोराखेडे, अंकुश राठोड, अर्चना खांबेकर, नायब सुभेदार राकेश कुमार, हवालदार संतोष शिर्के, उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी, प्रा. बी. सी. पाटील, प्रा. आर. एम.आंबेकर, प्रा. एस. एस. परदेशी, प्रा. के. के. चौरसिया उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड आपल्या भाषणात पुढे म्हणाले की राष्ट्रीय सेवा योजनेच्या व्यासपीठाचा उपयोग विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी करणे आवश्यक असून एडस जनजागृती, मतदार नोंदणी, कायदे विषयक जनजागृती आदी उपक्रमाच्या माध्यमातून विधायक कार्य करावे. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना व सिव्हिल हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या स्पर्धामध्ये प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. कु. संध्या गव्हाणे प्रथम क्रमांक, मंदा दुभाषे द्वितीय क्रमांक, राकेश अगिवले तृतीय क्रमांक यांनी यश संपादन केले. साथी सामाजिक संस्थेचे प्रमोद बोराखेडे, अंकुश राठोड यांनी एडस रोगाबद्दल सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. बी. सी. पाटील यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आर. एम. आंबेकर व संध्या गव्हाणे यांनी केले. आभार निर्मला जाधव यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा. यू. एन. सांगळे, प्रा. डी. के. भेरे, प्रा. एच. आर. वसावे, प्रा. जी. एस. लायरे, प्रा. एस. के. गव्हाणे व विद्यार्थी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!