
इगतपुरीनामा न्यूज – विषारी सर्पदंश झालेल्या व्यक्तीचे प्राण वाचवणे म्हणजे डॉक्टरांपुढे मोठे आव्हानच असते. अशा रुग्णावर तातडीने उपचार झाल्यास त्याचा जीव वाचू शकतो. इगतपुरीसारख्या आदिवासी दुर्गम तालुक्यात नेहमीच रुग्णांसाठी तत्पर आणि विविध सुविधा असणारे घोटी येथील समर्थ सह्याद्री हॉस्पिटल आहे. येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या अथक परिश्रमाला यश मिळाले असून घोटीवाडीच्या एका चिमुकलीचे प्राण वाचले आहे. काही दिवसांपूर्वी घोटीवाडी येथील एका चिमुकलीला घराजवळ अंगणात खेळताना विषारी सर्पदंश झाला होता. दंश झाला हे तिला कळालेच नाही मात्र तिचा घसा कोरडा होऊ लागला. तिला प्रचंड त्रास होऊन ती बेशुद्ध झाली. त्यानंतर तिला बेशुद्धावस्थेत घोटीच्या समर्थ सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तब्बल अकरा दिवस सर्पदंश झालेल्या मुलीवर उपचार करण्यात आले. तज्ञ डॉक्टरांच्या उपचारामुळे ह्या चिमुकलीचे बहुमोल प्राण वाचल्याने तिच्या आई वडिलांनी आभार मानले. समर्थ सह्याद्री हॉस्पिटलचे संचालक डॉ. अमन नाईकवाडी, डॉ. महेंद्र शिरसाठ, डॉ. देशपांडे, डॉ. दत्ता सदगीर, योगेश्वर भागडे, घनश्याम बऱ्हे आदींनी विषारी सर्पदंश झालेल्या मुलीला जीवदान दिल्याने आई वडिलांनी कृतज्ञता व्यक्त केली.