
इगतपुरीनामा न्यूज – बेदरकार वेगाने चालणारी वाहने, वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली आणि पोलिसांकडून वचक ठेवला जात नसल्यामुळे मुंबई आग्रा महामार्गावर छोटे मोठे अपघात वाढले आहेत. आज सकाळी पाडळीजवळ नासिककडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने कट मारल्याने मोटारसायकलचा अपघात झाला. हा अपघात करून अज्ञात वाहन पसार झाले. या अपघातात चेतन भगवान चव्हाण वय 18, कार्तिक राजू चव्हाण वय 17, विशाल चंद्रकांत चव्हाण व 19 रा. माणिकखांब हे युवक जखमी झाले आहेत. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेने तातडीने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. कामगार असणाऱ्या परिसरात प्रशासनाने अपघात रोखवण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे. मंगळवारी मुंढेगावजवळ झालेल्या अपघातात एक कामगार ठार आणि एकजण जखमी झाला होता. रोजच छोटे मोठे अपघात होत असल्याने नागरिक चिंतेत आहेत.