मिळून साऱ्याजणी.. केली मतदानाची पेरणी : मुकणे येथील आदर्श महिला ग्रामसंघाच्या ४०८ महिलांनी राबवले मतदान जनजागृती अभियान

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज – लोकसभेच्या मतदानासाठी मुकणे येथे सकाळपासूनच मोठ्या रांगा लागल्या होत्या. मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी मुकणे येथील आदर्श महिला ग्रामसंघाने जनजागृती अभियान राबवले. मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क व कर्तव्य असुन देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी मतदान करणे आवश्यक असल्याचे मतदान जनजागृती अभियानातून संबोधित केले. आदर्श संविधानाने प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला असल्याचे सांगत ग्रामसंघाच्या महिलांनी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मेहनत घेतली. यामुळे मुकणे येथे सकाळपासूनच महिला, पुरुष व सर्वांनी मोठ्या उत्साहात मतदानासाठी गर्दी केली होती. आदर्श महिला ग्रामसंघाच्या ४०८ महिलांनी एका रांगेत व एकच लाल रंगाच्या साड्या परिधान करून मतदानासाठी केलेली गर्दी पाहुन नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने मतदान केंद्रावर गर्दी केली. या मतदान जनजागृती अभियानासाठी भगवान आवारी, आदर्श ग्रामसंघ अध्यक्षा छाया मोगल, सचिव वैशाली राव, कोषाध्यक्ष रेवती उबाळे, सीआरपी सुमन राव, नूतन आंबेकर, उद्योग सखी शैला बोराडे ,कमल राव, किरण उबाळे, सारिका राव, ललिता बोराडे, शारदा बोराडे, रोहिणी राव, अनिता बोराडे, निता जाधव, भिमाबाई राव, सविता चारस्कर, मंदा आंबेकर, वंदना राव, अंजना वेल्हाळ, अलका दिवे, अर्चना साबळे आदींनी सहभाग नोंदवला

Similar Posts

error: Content is protected !!