
इगतपुरीनामा न्यूज – मुंबई आग्रा महामार्गावर गोंदे दुमाला प्रभू ढाब्याजवळ आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास भरधाव वाहनाचे टायर फुटून अपघात झाला. या घटनेत ४ जण जखमी झाले आहेत. मुंबईकडून नाशिकच्या दिशेने येत असताना वाहन क्रमांक MH 15 DS 1956 ह्याला अपघात होऊन वाहनाने पलटी मारली. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेने समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. अमित ऐनापुरे वय 47, अनघा ऐनापुरे वय 43,अजय दत्तात्रय कुलकर्णी वय 63,अनिता कुलकर्णी वय 58 सर्व राहणार नाशिक अशी जखमीची नावे आहेत.