पिंप्री सदो येथे भीम जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – भारतरत्न विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पिंप्री सदो येथे उत्साहात साजरी झाली. यावेळी बिनधास्त मित्र मंडळ, जयंती कमिटीतर्फे शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. शाळेसाठी सहा डस्टबीन देण्यात आले. ग्रामपंचायतीकडून दोन स्मार्ट टीव्ही शाळेला भेट देण्यात आल्या. जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामसेवक गुलाब साळवे होते. या कार्यक्रमासाठी पोलीस पाटील रमेश पाटेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदास वाकचौरे, माजी अध्यक्ष अमजद पटेल, तंटामुक्त समिती अध्यक्ष बबलू उबाळे, माजी उपसरपंच प्रकाश उबाळे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर कदम, ग्रामपंचायत सदस्य भास्कर सोनवणे,  जयश्री उबाळे, माजी उपसरपंच मंदा सोनवणे, जयंती कमिटीचे अध्यक्ष अविनाश उबाळे. माजी अध्यक्ष संतोष उबाळे, भगवा चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष पाटेकर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अय्याज पठाण, हरी कदम, नवनाथ सोनवणे, मुख्याध्यापक सुखदेव ठाकरे, शिक्षिका चेतना गावित, योगिता हाके. बिनधास्त मित्र मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, सर्व ग्रामस्थ उपस्थित होते सूत्रसंचालक विलास उबाळे यांनी केले.

Similar Posts

error: Content is protected !!