
इगतपुरीनामा न्यूज – मुंबई आग्रा महामार्गावर नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात असताना आठवा मैल जवळ आज दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र भिषण अपघात झाला. या अपघातात तीन जण गंभीर तर एक जण किरकोळ जखमी झाला. प्रविण भिका रोजेकर वय 52, हिरल प्रविण रोजेकर वय 46 या सिडको नाशिक, किसन अरूण धोंगडे वय 74, रुख्मिणी धोंगडे वय 48 रा. पाडळी देशमुख अशी जखमी व्यक्तींची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेने तात्काळ घटनास्थळी दाखल होत जखमींना पुढील उपचारासाठी नाशिकच्या खासगी दवाखान्यात येथे दाखल केले.