इगतपुरीनामा न्यूज – नाशिकच्या सिडको परिसरात एकाने लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर वेळोवेळी बलात्कार केला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात बलात्कारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिडकोतील उत्तम नगर भागात राहणाऱ्या एका पीडितेची नितीन सुकदेव गवते, रा. वाडीवऱ्हे ता. इगतपुरी याच्याशी ओळख झाली होती. २०२० मध्ये झालेल्या ओळखीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले. संशयिताने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेला वेगवेगळ्या भागात घेऊन जात बळजबरीने बलात्कार केला. हा प्रकार नोव्हेंबर २०२० ते डिसेंबर २०२३ या दरम्यान सुरू होता. सलग तीन वर्ष संशयिताकडून अत्याचार होत असल्याने युवतीने लग्नाचा तगादा लावला. मात्र संशयिताने शिवीगाळ व दमदाटी करीत मारहाण केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला आहे. याबाबत अधिक तपास अंबडचे पोलीस उपनिरीक्षक श्री. उंडे करीत आहेत.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group