टिटोलीच्या विद्यार्थ्यांकडून “मतदार राजा जागा हो.. राष्ट्रनिर्मितीचा धागा हो” पथनाट्याद्वारे जनजागर

इगतपुरीनामा न्यूज – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या ५ व्या टप्प्यात नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघात मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी टिटोली जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृतीपर प्रभावी पथनाट्य बसवले आहे. इगतपुरी तालुक्यात सर्वत्र ह्या पथनाट्याचे सादरीकरण विद्यार्थी करीत आहेत. मतदान प्रक्रियेत मतदारांचा जागरूकपणे सहभाग वाढावा यासाठी निवडणूक आयोग सक्रिय आहेत. मतदान प्रक्रियेविषयी जागरूकता वाढावी, त्या प्रक्रियेचे ज्ञान प्रत्येक मतदारापर्यंत पोहचावे, मतदान प्रक्रियेत सामान्य मतदाराचा सहभाग वाढावा हा या योजनेचा मूळ उद्देश साधला जात आहे. ह्या शाळेतील राज्य आदर्श तंत्रस्नेही शिक्षक सिध्दार्थ सपकाळे यांनी ह्या पथनाट्याचे लेखन केले आहे. लोकशाहीला खर्‍या अर्थाने लोकसहभागात्मक लोकशाही बनविणे हा योजनेचा मूळ उद्देश आहे. या पथनाट्याचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा उपसरपंच अनिल भोपे यांनी कौतुक केले आहे. पथनाट्यातुन मतदार जनजागृती व्हावी, आपला हक्क प्रत्येक मतदाराने बजवावा यासाठी आम्ही एक छोटासा जनजागृतीसाठी प्रयत्न केला आहे असे मुख्याध्यापिका मंगला शार्दुल यांनी सांगितले. पथनाट्य यशस्वीतेसाठी शिक्षक राजकुमार गुंजाळ, रामदास गंभीरे, प्रतिभा सोनवणे, मंगला धोंडगे, स्नेहल शिवदे यांनी परिश्रम घेतले. व्हिडिओ पहा👇

Similar Posts

error: Content is protected !!