
इगतपुरीनामा न्यूज : शासकीय, निमशासकीय, दिव्यांग कर्मचारी अधिकारी सहकारी पतसंस्था चेअरमनपदी सतिष लाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
संस्थापक अध्यक्ष कै.सुभाष वाघ यांनी स्थापन केलेल्या पतसंस्थेच्या संचालक मंडळाची बिनविरोध निवडणुक घोषित झाली होती. निवडणुक निर्णय अधिकारी स्वप्नाली शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच दिव्यांग कर्मचारी-अधिकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिगंबरराव घाडगे पाटील, पतसंस्थेचे माजी चेअरमन प्रमोद लोखंडे, पतसंस्थेचे माजी उपाध्यक्ष ललितजी सोनवणे, तसेच पतसंस्थेचे सचिव मनोहर नेटावटे व पतसंस्थेचे सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळ विकास अहिरे, दत्तात्रय पाटील, गणेश घारे, सोमा भालनोर, उत्तम चौधरी, विजय निरगुडे, प्रदिप महाले, प्रमोद लोखंडे, संगिता शिंदे, सरला नागरे, विजय पिंगळे, सतीष लाड, मनोहर नेटावटे कार्यालयीन कर्मचारी कल्याणी पवार व इतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली.
यात प्रामुख्याने पतसंस्थेच्या अध्यक्ष (चेअरमन) पदासाठी कार्यकुशल संचालक सतीष लाड यांची बहुमताने बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच पतसंस्थेच्या उपाध्यक्ष पदासाठी कर्तव्यदक्ष संचालिका सरलाताई नागरे यांची बहुमताने बिनविरोध निवड करण्यात आली. या प्रसंगी व्यासपिठावरील सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच व्यासपिठावरील मान्यवरांचे बिनविरोध निवड झाल्याबद्दल शुभेच्छारुपी मनोगत व्यक्त केले. शेवटी पतसंस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष सतीष लाड यांनी मनोगतातून सर्व सन्माननिय संचालक मंडळाचे व सर्व सभासदांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले. तसेच पतसंस्था वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करुन पतसंस्था भरभराटीसाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पतसंस्थेचे सचिव मनोहर नेटावटे यांनी तर सूत्रसंचालन प्रदिप महाले यांनी केले. आभार प्रदर्शन सोमा भालनोर यांनी केले.
